मोदींची बंगालवर ‘ममता’; इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालला सर्वाधिक कोरोना लस

PM Modi - Covid Vaccine

नवी दिल्ली : येत्या १६ जानेवारीला भारतात कोरोना (Corona) लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे याच संधीचा आगामी निवडणुकांसाठी लाभ घेण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) सुरू झाला आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात ५ लाख ६३ हजार डोस देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली होती; परंतु त्यातील केवळ १ लाख ३९ हजार ५०० च डोस मुंबईत आले आहेत.

 तर दुसरीकडे पश्चिम बंगालला सर्वाधिक म्हणजे तब्बल १० लाख डोस पाठवण्यात आलेत. त्यामुळेच आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी १ लाख ३९ हजार ५०० कोविशिल्ड लस आल्या  आहेत. मुंबईतील एफ दक्षिण विभागात बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास या लसींना घेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात एक व्हॅन मुंबईत दाखल झाली.

आज महाराष्ट्रातील मुंबईसह १३ राज्यांमध्ये लसी पोहचवण्यात आल्या आहेत. यानंतर १४ जानेवारीपर्यंत सर्व राज्यांत १.६५ कोटी डोस पोहचवण्यात येणार आहेत. खरं तर इतर राज्यांच्या तुलनेत टाळेबंदीत महाराष्ट्रातील कोरोनाची टक्केवारी ही ३० टक्के होती. त्यामुळे महाराष्ट्राला जास्त लसींची गरज होती. परंतु प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारने जादा लसींचा साठा कोलकात्याला पाठवला आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हे आरोप स्पष्ट शब्दात नाकारले आहेत.

भाजपने आगामी बंगालच्या निवडणुकांसाठी जोरदार रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपकडे कोरोना लस हा हुकमी एक्का आहे. त्याचा ते जोरदार प्रचार करतील यात तीळमात्र शंका नाही. परंतु विरोधकदेखील सरकारचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER