पंतप्रधान मोदींच वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉइनची मागणी

pm-modi-personal-website-hacked

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक (Hacked) करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटच्या (Personal-website) ट्विटर अकाऊंटला २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने यावरुन ट्वीट देखील केलंय. पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडमध्ये बिटकॉइनने दान देण्याची मागणी याद्वारे करण्यात आली. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट केलं. गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला.

जॉन विक ([email protected]) या अकाऊंटने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक केलं. आता हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. आम्हाला याबद्दल माहिती मिळाली होती आणि सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आली होती अशी माहिती ट्वीटरने दिली. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. आणखी कोणती अकाऊंट हॅक झाली का ? याबद्दल अधिक माहिती नसल्याचेही ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना ट्विटरनेही पंतप्रधान मोदींची वैयक्तिक वेबसाइट नोंदणीकृत असल्याची कबुली दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER