पंतप्रधान मोदीं ८३ दिवसांनंतर दिल्ली बाहेर; अम्फन वादळाच्या पार्शवभूमीवर ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा

PM Modi

नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन होऊन दोन महीने झालेत. या दरम्यान, जगभरातील कोरोनाच्या उद्रेकामुळे पंतप्रधान मोदी यांचे विदेश दौरे बंद होते. मात्र, आता पश्चिम बंगाल, ओडीशात अम्फान वादळाने हाहाकार केला आहे. त्यामुळे आज मोदी अम्फान चक्रीवादळामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी पश्चिम बंगालसाठी रवाना झाले आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्पान वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली.

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. सहा लाख जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आतापर्यंत असा हाहाकर आपण कधीही पाहिला नसल्याचे सांगत पंतप्रदान मोदींनी येथे येऊन पाहणी करावी असे बॅनर्जी यांनी म्हटले होते. तसेच, अम्फानमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर मोदींनी लगेच ट्विट करून येतो असे कळवले.

मोदी आज सकाळी १०.४५ वाजता दमदम विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यानंतर ते १०.५० वाजता बशीरघाटला जाणार आहेत. यानंतर मोदी ११.२० वाजता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत अम्फानमुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये बैठक होणार आहे. यानंतर दुपारी १.३० वाजता मोदी ओडिशाला रवाना होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला