कोरोना परिस्थिती, लसीच्या वाटपावर पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

PM Modi

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची (corona) स्थिती, लशीची निर्मिती आणि वाटप या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 24 नोव्हेंबर रोजी याबाबतची बैठक होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

करोना लस वाटपासंबंधीचं धोरण तसंच देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने करोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसंच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील.

पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नंतर इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा असेल. या बैठकीत करोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील.

दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी राहत असताना काही राज्यांमध्ये करोना संकट नव्याने उभं राहत असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER