‘ती’ मुलाखत फिक्स होती ? व्हिडीओ व्हायरल; काँग्रेसचे मोदींवर आरोप

divya spandana-pm modi

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरून मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, या संपूर्ण मुलाखतीचं कथानक आधीच तयार होतं आणि त्यातील प्रश्नदेखील ठरवून विचारण्यात आले, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी केला.

ही बातमी पण वाचा :- प्रियांकाच्या रोड शोमध्ये ‘मोदी मोदी’च्या घोषणा; प्रियांका म्हणाली ‘ऑल द बेस्ट’!

ट्विटरच्या माध्यमातून मोदींच्या मुलाखतीसंदर्भातला एक व्हिडीओ काँग्रेसतर्फे शेअर करण्यात आला आहे. त्यात मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे. तसंच ‘सवाल संख्या २७’ असंही लिहिलेलं दिसतं. कवितेच्या वरती काही प्रश्न लिहिलेले दिसतात आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते, अशी टीका स्पंदना यांनी मोदींवर केली . तसेच स्पंदना यांनी व्हिडीओखाली एक कॅप्शनही लिहिले आहे- ‘आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत.’