पंतप्रधान मोदींकडून मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!

PM Modi greets people on Eid-ul-Fitr

नवी दिल्ली: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजानचे तीस रोजे पूर्ण झाले असून जगभरात आज ईद-उल-फित्रचा सण साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे यंदा घरातच ईद साजरी करावी लागत आहे. तसेच, अनेकजण सोशल मीडियावरून एकमेंकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत.

ही बातमी पण वाचा:- ईद-उल-फित्रनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-फितरच्या शुभेच्छा. या खासप्रसंगी करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी. प्रत्येकाने निरोगी आणि समृद्ध राहावे.” असे ट्विट मंतप्रदान मोदींनी केले आहे.

दरम्यान, रमजानचा महिना पूर्ण झाल्यावर ईद साजरी केली जाते. 29 किंवा 30 दिवसांचे रोजे पूर्ण झाल्यावर चंद्र दर्शन झाल्यावरच ईद साजरी केली जाते. सौदी अरेबिया, युएईसह सर्व आखाती देशांमध्ये ईदचा चंद्र 23 मे रोजी दिसला, त्यानंतर ईद 24 मे रोजी साजरी करण्यात आली. भारतात 24 मे रोजी ईदचा चंद्र दिसल्यानंतर संपूर्ण देशात ईदचा सण आज साजरा होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER