पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, उदयनराजेंनी दिली ही प्रतिक्रिया

PM-modi-shivaji-maharaj-Udayanaraje Bhosale

मुंबई : भारतीय जनता पक्ष्याच्या दिल्ली कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या सांस्कृतिक संमेलनात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपावर सर्व स्तरावरून निशाणा साधला जात आहे .

या सगळ्या गदारोळावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केलीय. उदयनराजे म्हणाले, या पुस्तका संदर्भात मी सविस्तर माहिती घेईल, कोण काय बोलतोय हे पाहतोय आणि यानंतर माझी भूमिका माध्यमांसमोर लवकरच मांडेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे सर्वजण वागले तर देशात सध्याची जी काय परिस्थिती आहे जी अराजकता आहे ती राहणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे .

दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला आहे. “शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?,” असा प्रश्न राऊत उपस्थित केला आहे. सोबतच यावरून जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे.

तसंच, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजप, असं म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

हा प्रकार भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का – संजय राऊत