पंतप्रधान मोदी ‘सेंट्रल विस्टा’ उभारण्यात व्यस्त : अमोल कोल्हे

PM Modi busy building Central Vista-Amol Kolhe

मुंबई :- महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा (Corona virus) भीषण हाहाकार सुरू आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांचा जागोजागी खच पडला आहे. केंद्र सरकार मात्र वेगळ्याच कामात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली आहे.

यासंबंधी कोल्हे यांनी सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्या आवाजातील एक कविता मांडली आहे. ज्यामध्ये देशातील वास्तविकता  मांडण्यात आली आहे. यामध्ये मोदी सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी सुरू आहे. आरोग्यव्यवस्था अपुरी आहे. सद्य:स्थितीत लसींचा तुटवडा जाणवत असताना मोदी (PM Modi) मात्र नवे संसद भवन (सेंट्रल विस्टा) (Central Vista) उभारण्यात व्यस्त आहेत, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला.

एवढेच नव्हे, तर या देशाचा आक्रोश ५६ इंचाच्या छातीला जाणवत नाही का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी कवितेत केला आहे. यामध्ये त्यांनी देशातील सध्याची परिस्थिती आणि त्यावर सरकारचे काय सुरू आहे, असे अनेक मुद्दे मांडले आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल आणि सध्या काय राजकारण सुरू आहे, यावर परखड भाष्य केले आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागे व्हा! : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला विरोधी पक्षांचा पुन्हा विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button