मोदी यांनी मोडला वाजपेयींचा विक्रम

Atal Bihari Vajpayee-PM Modi

नवी दिल्ली :  सर्वात जास्त सेवा देण्याच्या पंतप्रधानांच्या यादीत नरेंद्र मोदी (PM Modi) चौथ्या क्रमांकावर आले आहेत. गैर काँग्रेसी पंतप्रधानांच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त कार्यकाळ पूर्ण केला आहे. असे करताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे यापूर्वी आघाडीवर होते.

१५ ऑगस्ट (15 Aug) रोजी मोदी सातव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत. लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा तिरंगा फडकविताना पंतप्रधान मोदी चौथ्या क्रमांकावर येतील. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्यात पं. नेहरू प्रथम क्रमांकावर आहेत.

सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिले पहिले तिन्ही नेते काँग्रेस पक्षाचे होते. बिगर काँग्रेसी नेत्यांमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्यात मोदी आघाडीवर आले आहेत. मोदी यांनी तसे करताना अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडला. वाजपेयी २२६८ दिवस पंतप्रधानपदावर आसनस्थ होते. मोदी आता त्यांच्या पुढे गेले आहेत. पं. जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या खालोखाल इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांचा क्रमांक लागतो. चौथ्या क्रमांकावर विद्यमान नरेंद्र मोदी आले आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी जेव्हा मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, तेव्हाही त्यांच्या नावे एक नवा विक्रम होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER