PM किसान संबंधित केसीसी योजना : १७५ लाख अर्ज मंजूर

नवी दिल्ली :- केंद्र सरकारने )Central Government) शेतीसाठी कर्ज घेणे अधिक सोपे केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) योजना’ (KCC Yojana) सोबत ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ योजनादेखील जोडली आहे. सरकारने दोन्ही योजना एकत्र करून ‘केसीसी’ बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. यात १७४.९६ लाख अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच १ लाख ६३ हजार ६२७ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

कोरोना दरम्यान सरकारने २ लाख कोटी रुपये खर्चाची मर्यादा असलेली ‘केसीसी’ देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी २५ लाख कार्डे बनविण्यात आली आहेत. म्हणजेच या मोहिमेअंतर्गत आणखी ७५ लाख शेतकऱ्यांना ‘केसीसी’ मिळणार आहे. ‘केसीसी’ अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जे फक्त ७ टक्के व्याजदराने मिळतात. आपण वेळेत पैसे परत केल्यास ३ टक्के सूट मिळते. अशा प्रकारे, प्रामाणिक शेतकर्‍यांना केवळ ४ टक्के व्याजदराने पैसे मिळतात.

केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १६.५ लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यातून शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळू शकणार. या ‘केसीसी’ योजनेचा शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी सरकारची इच्छा आहे. देशात जवळपास ८.५ कोटी ‘केसीसी’ धारक आहेत.

बँकांना ‘केसीसी’ द्यावे लागणार

पीएम किसान योजनेचे सुमारे ११ कोटी लाभार्थी आहेत. या शेतकर्‍यांच्या जमिनी आणि त्यांच्या बायोमेट्रिकची नोंद सरकारकडे आहे. या दोन्ही योजना जोडल्या गेल्या आहेत. मात्र, आता बँक अधिकारी शेतकऱ्यांना कर्ज देताना अर्जदारांकडे दुर्लक्ष करणार नाहीत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी ‘केसीसी’ अंतर्गत कर्ज मिळण्याची प्रक्रिया अवघड होती. म्हणूनच ‘केसीसी’ला पंतप्रधान किसान योजनेशी जोडले गेले. आता ‘केएमसी’ फॉर्म पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरच उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे बँकांना केवळ तीन कागदपत्रे घेऊन त्या आधारे कर्ज देण्यास सांगितले आहे. तसेच अर्जदार शेतकरी आहे की नाही ते पाहण्यासाठी त्याचा महसूल रेकॉर्ड तपासावा लागेल. ओळख पटवून देण्यासाठी आधार, पॅन कार्ड, फोटो काढला जाईल. अर्जदारांचे कर्ज कोणत्याही बँकेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. सरकारच्या निर्देशानुसार बँकांनी ‘केसीसी’ बनवण्याचे प्रक्रिया शुल्क रद्द केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER