पीएम केअरला अडीच लाख रुपये दिले, पण मिळाला नाही आईला बेड; दात्याची खंत

Vijay Parikh - PM Care Fund - PM Narendra Modi

अहमदाबाद : कोरोनाविरोधाच्या (Corona) लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आवाहन केले आणि मी पीएम केअर फंडाला (PM Care Fund) २ लाख ५१ हजार रुपये दिले; पण स्वत:च्या आईला कोरोना झाल्यानंतर तिला अखेरपर्यंत कुठेही बेड मिळाला नाही, अशी खंत गुजरातमधील विजय पारिख यांनी व्यक्त केली.

विजय पारिख (Vijay Parikh) यांनी सोशल मीडियातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त करताना २ लाख ५१ हजार रुपये पीएम केअरला दिल्याचे सर्टिफिकेटही शेअर केले आहे. विजय पारिख म्हणाले की, “अडीच लाखांची मदत केली तरी माझ्या मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मी अजून किती रुपये दान केले पाहिजेत ज्यामुळे माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना बेड मिळेल, त्यांचा जीव जाणार नाही?”

विजय पारिख यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्मृती इराणी आणि राष्ट्रपती भवनला टॅग केले आहे.

पारिख म्हणतात की, “माझ्यासारखे या देशात अनेक आहेत. पैसा हा मुद्दाच नाही. पैशाने इतर रुग्णांना सुविधा मिळत असतील तर मी माझी सर्व संपत्ती दान करायला तयार आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button