लॉकडाऊनवरुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकमेकांसमोर?

Lockdown-CM Thackeray-PM Modi

मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळं गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यातून अर्थव्यवस्था अजून सुधारली नाही. राज्यात आर्थिक परिस्थीती बिकट आहे. व्यवसायिकांनी कामगार कपातीला सुरुवात केलीये. ‘जनरल मोटर्सनं’ १,१४९ कामगार कमी केलेत. लॉकडाऊनचे वाईट परिणाम भोगल्यानंतरही पुन्हा महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं बोलत आहेत. तर पंतप्रधान लॉकडाऊनच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. आज रात्री ८ वाजून ४५ मिनीटांनी त्यांनी देशाला संबोधित करताना हा संदेश दिला. राज्यांनी लॉकडाऊनकडं शेवटचा पर्याय म्हणून पहावं असं ते म्हणालेत.

कोरोना (Corona) रोखण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड यांच्यासह अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं केंद्र सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. आता पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केलाय. देशातील जनतेचे प्राण आपल्याला वाचवायचे आहेतच. सोबतच आपल्याला अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार सर्वात शेवटी व्हावा, असं मोदींनी म्हटलंय

महाविकास आघाडीचे नेते लॉकडाऊनबद्दल आग्रही

कोरोना हाताळण्यात राज्यसरकार हतबल असल्याचं दिसत असून आता परिस्थीती सांभाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हाच एकमेव पर्याय असल्याचं दिसून येतंय. कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. राज्यातील करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक आहेत. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी तसं संकेत दिलेत.

राजधानीत परिस्थीती गंभीर

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावाला लागेल, अशी माहिती माध्यमांना दिलये. कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नाहीयेत, अशी परिस्थिती आहे. यामुळं महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल लवकरच त्यासंबंधी गाइडलाइन जारी करण्यात येतील, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. यामुळं मुंबईत कडक लॉकडाऊन (Mumbai Lockdown) केलं जाईल हे निश्चित असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

“शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा”- राजेश टोपे

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले असून आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झालाय. कोरोनाची हाताबाहेर जाणारी परिस्थीती रोखण्यासाठी, “राज्यात बुधवारी रात्री आठपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय मुख्यमंत्री घेतील”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच, “उद्या रात्री आठनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करतील”, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लॉकडाऊन हा १५ दिवसांचा असेल. तसंच, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. मात्र, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासांतच कठोर लॉकडाऊनच्या गाइडलाइन जारी होईल अशी माहिती समोर येत आहे. तसंच, मुंबई लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार असल्याचं समजतंय.

दहावीच्या परीक्षा रद्द

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं राज्यात आरोग्य, उद्योग, व्यवसाय क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसलाय. राज्यात आरोग्य आणीबाणी असताना परिक्षा घेऊ नयेत अशी मागणी जोर धरत होती. यावर आज निर्णय घेण्यात आला. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. त्याप्रमाणं महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मोदी म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशाला संबोधित करत, कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं नाही. एकत्रित प्रयत्न करुन हे तुफान उधळून लावू असं ते म्हणालेत. कोरोना विषयक देशातल्या परिस्थीतीचा आढाव घेतल्यानंतर, कोरोनाशी लढण्यासाठी शक्यत्या मार्गांबद्दल चर्चा केली. या संबोधनात त्यांनी लॉकडाऊनबद्दल विधान केलं.

लॉकडाऊकडं शेवटचा पर्यात म्हणून पहावं, नियम पाळून कोरोनावर मात करावी असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. लॉकडाऊन कशा स्वरुपाचं असेल ही माहिती सुद्धा त्यांनी जनतेला दिली. राज्यातील लॉकडाऊन हा १५ दिवसांचा असेल. तसंच, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. मात्र, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासांतच कठोर लॉकडाऊनच्या गाइडलाइन जारी होईल अशी माहिती समोर येत आहे. तसंच, मुंबई लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार असल्याचं समजतंय.

तरुणांकडून व्यक्त केली आशा

देशात कोरोनामुळं आरोग्य आणीबाणी निर्माण झाल्याचं चित्र लक्षा घेता, पंतप्रधान मोदींनी युवकांना विनंती केलीये, ते म्हणाले “माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button