संघाच्या कामगिरीवर खूष असलेल्या प्रीती झिंटाने स्टेडियमचे कठोर नियम मोडले

Preity Zinta

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर यांच्यातील सामन्यात चुकीच्या खुर्चीवर बसून प्रीती झिंटाने नियमांचे उल्लंघन केले.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर (RCB) यांच्यात झालेल्या सामन्यात असे काही घडले की त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. सामन्यात पंजाब संघाची मालकीन प्रीती झिंटा (Preity Zinta) नेहमीप्रमाणेच संघाचे मनोबल वाढवण्यासाठी मैदानावर उपस्थित असून ज्या पद्धतीने संघाची सुरुवात झाली तिला आनंद झाला. परंतु या आनंदात, तिने असे काहीतरी केले जे मैदानाच्या नियमांच्या विरुद्ध होते. वास्तविक, ज्या ठिकाणी प्रीती झिंटा बसली होती प्रत्यक्षात तिथे बसण्यास मनाई होती.

सामन्यादरम्यान, आपल्या टीमला चीअर करताना प्रिती झिंटा ज्या खुर्चीवर बसली होती तिथे स्पष्ट लिहिले होते. त्या खुर्चीवर इंग्रजीत लिहिलेले होते, ‘Please do not sit here’. असे असूनही, ती तिथे बसलेली दिसली.

या सामन्यात पंजाबच्या संघाने शानदार फलंदाजी करत बैंगलोर समोर २०७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आणि संघाचा कर्णधार के.एल. राहुलने या सामन्यात आपले शतक पूर्ण केले. कोरोना साथीच्या आजारामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम दुबईमध्ये खेळला जात आहे आणि येथे सुरक्षा व्यवस्थाही जोरदार आहे. या कारणास्तव, सामन्यात प्रेक्षकांना देखील परवानगी नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER