आम्हाला समजून घ्या

Sad Child

हाय फ्रेंड्स ! आजकाल खूप पालक तक्रार करतात की त्यांच्या मुलांना लिहायचा, वाचायचा किंवा अभ्यासाचा कंटाळा येतो. किंवा एखादा विद्यार्थी खूप आळशी आणि ठोंब्या आहे. कोणत्याही शाळेत वर्गावर्गातून वेगवेगळ्या प्रकारची ,स्वभावाची ,वर्तणूक असणारी मुलं विद्यार्थी असतातच. कुणी वर्गात बोलत नाही तर कुणी वर्गामध्ये सतत फिरत. आणि बोलत राहतो.

कुणी वर्ग चालू असताना डिस्टर्ब करते, तर कुणी ग्राउंड वर मारामारी करण्यात पटाईत ! कुणी प्रामाणिकपणे अभ्यासाला वाहून घेतलेलं, तर कुणी परीक्षेच्या दिवसापर्यंत पुस्तकही न उघडलेला. अशा सगळ्यांना सांभाळताना शिक्षकांना कसरतच करावी लागते ,आणि ते आपले सगळी कौशल्य वापरून ती कामे करत असतात. मात्र आपल्या शिक्षण व्यवस्थेत सगळ्यात जास्त महत्त्व अभ्यासातील गुणवत्तेला आणि औपचारिक शिक्षणाला आहे .

मार्कांच्या आधारे सगळीकडे हुशारी मोजली जाते. मग जी काही मुले अभ्यासात मागे पडतात ,त्यांना सगळीकडे शिक्षा होतात. बोलणी ,मार खावी लागतात. त्यातील बऱ्याचशा मुलांची बुद्धिमत्ताही उत्कृष्ट असते. म्हणजे पिक्चरच्या स्टोरीज किंवा गाणी त्यांना छान पाठ असतात आणि मग एवढं सगळं असूनही जेव्हा मूल अभ्यास करत नाही, लिहिण्याचा, वाचण्याचा कंटाळा करत राहतो. त्यावेळी तो आळशी ,ठोंब्या ठरतो .घरी-दारी त्यांना राग सहन करावा लागतो .खरेतर शिक्षक हे पूर्ण प्रयत्नांनीशी प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवत असतात .त्याची प्रगती व्हावी म्हणून प्रयत्नशीलही असतात .असे असूनही जेव्हा अकॅडमिकली मागे राहून काही मुले पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.

मग याची काय कारणं असू शकतात ?

  • त्यापैकी काहींची बुद्धिमत्ता छान असते, ते प्रयत्नही करतात पण मार्क्स मिळत नाही.
  • काहींचे वागण्याचे प्रश्न (बिहेवियर प्रॉब्लेम) असतात. त्यांना आवडी अभावी अभ्यासात यश येऊ शकत नाही.
  • आणि काही मुले त्यांच्या शारीरिक किंवा बौद्धिक अपंगत्वामुळे योग्य प्रयत्न करू शकत नाही.

कमी मार्क्स मिळणे हे कुठल्यातरी गोष्टीचे केवळ एक लक्षण आहे, जसे की एखाद्याला कफ झाला तर कफ कशामुळे होऊ शकतो ? याचा शोध घेऊन डॉक्टर न्यूमोनिया, टी बी ,कॅन्सर ,आता( सारी) वगैरे चे निदान करतात. त्याच प्रकारे प्रयत्न अभ्यासात मागे पडण्याचे कारण नेमके शोधण्याकरता हि करता येतात .मुले अभ्यासात मागे आहे, मार्क्स कमी येतात आहे ,अशांमध्ये अगदी सुरुवातीपासून जर प्रॉब्लेम असेल ,तर यात फोकस फक्त विद्यार्थ्यांवरच करावा लागतो.

परंतु जर आठवी नववी नंतर परफॉर्मन्स घसरत असेल तर कदाचित कारणे इतरत्र म्हणजे आजूबाजूच्या वातावरणातही शोधावी लागतात. आपण जी कारणं बघणार आहोत यावरून लक्षात येईल की कुठलंही मूल हे मूर्ख, आळशी, बावळट, ठोंब्या नसते .ते आनंदी, उत्साही, अभ्यासू असणारच ! पण जर कमी मार्क येत असतील तर, त्याला कुठलीतरी अध्यायनाशी संबंधित समस्या नक्की असते आणि म्हणूनच लहान मुलांमध्ये ते केवळ एक लक्षण समजून कारणांचा वेध घेतला गेलाच पाहिजे. आणि म्हणूनच आपण शास्त्रीय दृष्ट्या मूल्यमापन करून त्यामागचे कारण शोधून उपाययोजना शोधायला पाहिजेत.

1) शारीरिक समस्या : काही मुले जेव्हा अभ्यासात कमी पडतात, त्यावेळी त्यांच्या शिक्षकांकडून तक्रारी येतात .तो विद्यार्थी बोर्डवरची उतरवून घेऊ शकत नाही, त्याचा वेगही कमी आहेझ आणि लिखाणात अचूकताही नाही. मुख्य त्याच्या नोट्स किंवा वह्या नेहमी अपूर्ण असतात .अशावेळी बरेचदा त्यांना टीव्हीवरचे ही नीट वाचता येत नसते ,बोर्डवरचे नीट दिसतही नाही .यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जायला हवे. अशा विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात दृष्टिदोष ,श्रवणदोष हे त्यांच्या अभ्यासात मागे असण्याचे कारण आहे का ते बघावे.

2) दुसरा भाग म्हणजे विकासातील टप्प्यांमध्ये उशीर .याला “डेव्हलपमेंटल डीले “असेही म्हणतात. काही मुले उशिरा बोलायला ,चालायला लागतात .त्यातील काही जणांच्या मेंदूची वाढ ही सामान्य पेक्षा अयोग्य झालेली असू शकते आणि ते सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्तेचे Intellectual disability असू शकतात. अभ्यासात मागे पडतात. त्यासाठी आई क्यू (IQ) टेस्ट असते. त्यावरून मुल slow learner आहे का ते बघता येते.

3) काही कौशल्य बाळाच्या विकासात कमी वा हळू गतीने विकसित होतात. उदाहरणार्थ वाचीक दोष किंवा फाइन मोटर, ग्रॉस मोटर स्किल्स. म्हणजे यात संवाद, आपल्या भावना व कल्पनांची अभिव्यक्ती,किंवा पेन पेन्सिल ची आयोग्य पकड, यामुळे येणारे चुकीचे हस्ताक्षर आणि लिहिण्याचा कंटाळा या गोष्टी येतात.

4) काही विशिष्ट अभ्यास कौशल्यांचा विकास न होणे किंवा लर्निंग disability. यात मुलांची बुद्धिमत्ता नॉर्मल, चांगली असते, पण विशिष्ट कौशल्य उदाहरणार्थ .लिहिणे, वाचणे ,स्पेलिंग, गणित या मेंदूतील विशिष्ट केंद्रांचा म्हणजे यापैकी एक किंवा दोन केंद्रांचा विकास योग्य नसतो. यालाच “लर्निंग डिसेबिलिटी” असं म्हणतात. हीच मुले विशेष करून अशी ठोंब्या म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असते. याचे कारण म्हणजे त्यांची बुद्धी चांगली असते. फक्त काही क्षमता ज्या लिहिण्यासाठी आवश्यक आहेत त्या, किंवा ज्या वाचण्यासाठी आवश्यकता आहे त्या, आकडेमोड करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या अशा विशिष्ट गोष्टी ते करू शकत नाही. आणि हे नेमकं कशामुळे हे कोणालाही कळू शकत नाही. त्यामुळे अशी मुलं खूप सफर होतात. ( यालाच स्पेसिफिक डिले इन डेव्हलपमेंट म्हणतात तर याउलट ID असणाऱ्यांना ग्लोबल डीले इन डेव्हलपमेंट असे म्हणतात.)

5) याशिवाय इतर न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये अस्वस्थ असणे, सतत हालचाल करणे, उत्तरे देताना किंवा खेळताना आपली टर्न येण्याची वाट बघणे, एकाग्रचित्त न होणे, अशा गोष्टी ज्यांच्या बाबत होतात, त्यांना “अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसॉर्डर (ADHD)” म्हणतात एकाग्रतेचा अभावी आणि अस्वस्थतेचा शिकण्यावर परिणाम होऊन ही मुले अभ्यासात मागे राहतात.

6) भावनिक दृष्ट्या किंवा वर्तन दृष्ट्या समस्याग्रस्त मुले ही अभ्यासात मागे राहतात. जरी ती चांगली बुद्धिमान असली तरी काहींना शाळेत जाण्याची भीती असते ,काहींना चिंतेचा आजार असतो काही उद्धट वर्तन किंवा इतर वागण्यातील अडचणीमुळे अभ्यासाकडे त्यांचे दुर्लक्ष होते.

7) मुलांच्या आजूबाजूचे वातावरण म्हणजे घरातील आणि पालकांमधील संघर्ष, घटस्फोट बेशिस्त किंवा अतिशिस्त असणारी घरे, योग्य मित्र शिक्षक न मिळणे ,वारंवार शाळा बदलणे, मिडीयम बदलणे अशा अनेकविध कारणांनी मुले अभ्यासात मागे लागू शकतात अशावेळी ती बुद्दू , मूर्ख पण नसतात आणि आळशी ठोंब्या देखील !

फ्रेंड्स ! म्हणूनच अशा सगळ्यांना समजून घेऊन ,त्यांचा नेमका प्रश्‍न शोधायला मदत करायला पाहिजे. त्यांना योग्य ठिकाणी पोहोचायला मदत करायला हवी, अशावेळी स्कूल कौन्सिलर, किंवा चाईल्ड कौन्सिलर यांची मदत होऊ शकते. त्यामुळे त्यांचे आयुष्य उभे राहू शकते. याउलट मुलांवर केलेला शिक्कामोर्तब त्यांचे आयुष्य नासवू शकते.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER