
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्र आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज संध्याकाळी सहा वाजता झूम मीटिंग या ॲपच्या माध्यमातून संवाद साधला. ही मिटिंग तब्बल १५ ते २० मिनिटे चालल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या मीटिंगमध्ये अमित ठाकरेही उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र काहीही असो शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते त्या क्षणाची आज पूर्तता झाली. कोरोना परिस्थितीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचे बघायला मिळाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला