कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Bombay High Court-Kangana Ranaut

मुंबई : वादग्रस्त वक्तव्य आणि शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडविल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. यामुळं तिचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावं यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court)ही याचिका दाखल करण्यात आली आहे. समाजात तेढ निर्माण करणं, द्वेष पसरवणं, बेताल वक्तव्य आणि देशद्रोहाचा प्रयत्न हे आरोप कंगनावर करण्यात आले असून कंगनाचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात यावं, अशी मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर कंगनानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझा आवाज दाबण्याचा, बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER