
तुम्ही म्हणाल क्रिकेट खेळला म्हणून कसा कोणी ट्रोल होऊ शकतो. तुमचे म्हणणे खरे आहे. आमिर खानला बॉलिवुडमध्ये (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जातो. तो सिनेमा करीत असो वा नसो तो नेहमी चर्चेत असतो. स्वतःच्या सिनेमाचे प्रमोशन कसे करावे हे खरे तर सगळ्यांनी आमिर खानकडून (Aamir Khan) शिकण्यासारखे आहे. आमिर खान सोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टिव्ह असतो. कधी कधी तो काही प्रतिक्रिया देतो पण त्याच्यावर टीका सुरु झाल्यावर मात्र तो गप्प बसतो. आमिर खानने नुकताच एक व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडियोत तो मुलांबरोबर क्रिकेट खेळताना दिसत आहे. मात्र या व्हिडियोमुळेच तो प्रचंड ट्रोल होऊ लागला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडियोत आमिर खान बॅटिंग करताना दिसत असून तो चौके छक्के लगावतानाही दिसत आहे. त्याची बॅटिंग पाहून बाजूला आमिरचा खेळ बघत उभी मुले उत्साही दिसत आहेत. एवढेच नव्हे तर आमिरला खेळताना मोबाईलमध्ये शूट करणारा फोटोग्राफरही प्रचंड उत्साहात असल्याचे दिसत आहे. आमिरला बॅटिंग करताना बघून उपस्थित सगळ्यांना ‘लगान’च्या भुवनची आठवण नक्कीच आली असेल. खेळून झाल्यानंतर आमिरने क्रिकेट पाहाणाऱ्या मुलांसोबत फोटोही काढले. आता तुम्ही म्हणाल यात चुकीचे काय आहे? तर चूक ही आहे की, आमिरने मास्क न घालता लहान मुलांबरोबर फोटो काढल्याचे दिसत आहे. मास्क न घालता लहान मुलांबरोबर फोटो काढल्याने आमिर खान ट्रोल होऊ लागला आहे.
अभिनेत्री किश्वर मर्चंटने (Kishwer Merchant) या व्हिडियोवर ट्विट करताना, आमिरसोबत असलेल्या एकानेही मास्क घातलेला नाही आणि आमिरनेही मास्क घातलेला नाही. का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याबरोबर किश्वरच्या समर्थनार्थ अनेक जण उतरले आणि त्यांनीही आमिरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने तर म्हटले की, ‘कदाचित त्यांना त्यांच्या मृत्यूची भिती वाटत नसेल. तर काही फॅन्सनी आमिरच्या सपोर्टमध्ये ट्विट केले. क्रिकेट खेळताना दम लागतो म्हणून आमिरने मास्क घातला नसेल असे म्हटले आहे. एकूणच या व्हिडियोमुळे आमिरचे फॅन्स आणि विरोधक ट्विटरवर चांगलेच एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला