‘शिवछत्रपती’ पुरस्कार परत करण्याचा खेळाडूंचा निर्णय

Players decide to return 'Shivchhatrapati' award

मुंबई :- राज्य सरकारने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त (Shiv Chhatrapati Award) खेळाडूंच्या थेट नियुक्तीसंदर्भात शिवजयंतीपर्यंत निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील १०३ छत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू आपापला सन्मान सरकारला परत करण्याचा इशारा पुरस्कारविजेत्या खेळाडूंनी दिला.

राज्यभरातील शेकडो खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र पुरस्कारानंतरही अनेक खेळाडू सध्या बेरोजगार असून उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहेत. खेळाडूंना पुरस्कारापेक्षा सध्या उपजीविकेसाठी नोकरीची खरी गरज आहे. थेट नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी खेळाडूंची मागणी आहे. गेल्या चार वर्षांपासून ते राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अजूनपर्यंत यासंदर्भात कसलाही सकारात्मक निर्णय नाही. राज्य सरकारने येत्या १९ पर्यंत (शिवजयंतीपर्यंत) खेळाडूंच्या हिताचा अर्थात थेट नियुक्तीचा निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील १०३ शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू २४ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडक देऊन पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सन्मानाने परत करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER