प्लेयर ऑफ दी सेंच्युरी आता ‘वर’ धमाल करणार

Player of the Century Maradona

ब्युनोस आयर्स: अर्जेंटीनाचा फूटबॉल सुपरस्टार दिएगो मॅराडोना (Diego Maradona)याचे हृदयगती बंद पडल्याने बुधवारी निधन झाले. तो ६० वर्षांचा होता. १९८६ मध्ये अर्जेंटीनाच्या विश्वविजयाचा तो शिल्पकार होता. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अर्जेंटीना फूटबाॉल (Argentina football) असो.ने या वृत्ताची पुष्टी केली आहे. व्टीटरवर त्यांचे अध्यक्ष क्लाोडीयो तापिया यांनी दिएगो मॅराडोना यांच्या निधनाबद्दल आपल्याला अतिव दु:ख होत असल्याचे म्हटले आहे. तो आमच्या हृदयात कायम राहील असेही त्यांनी म्हटले आहे. त्याच्यावर मद्यमुक्तीसाठीही उपचार सुरु होते. त्याच्या मेंदू आणि मेंब्रेनदरम्यानच्या जागेत रक्त साकोळले होते. डिप्रेशन, अनिमया, डीहायड्रेशनची लक्षणे त्याच्यात सुरुवातीला दिसत होती.

फूटबॉलच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये मॅरोडाोनाची गणना होते. मात्र त्याची कारकिर्द व खासगी आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले. १९८६ च्या िवश्वचषक स्पधेत इंग्लंडिवरुध्दचा त्याचा ‘हँड ऑफ गॉड’गोल अतिशय वादग्रस्त ठरला होता. नापोली क्लबसोबत त्याची यशस्रवी कारकिर्द राहिली. नापोलीला त्याने १९८७ मध्ये सेरी ए िवजेतेपद िजंकून िदले होते. १९९० मध्ये दुसऱ्यांदा नापोली िवजेते ठरले. १९८७ मध्ये त्यांनी इटालीयन कप व १९९१ मध्ये युईएफए कपसुद्धा जिं’कला. या योगदानासाठी नापोलीने सन २००० मध्ये त्याची १० नंबरची जर्सी निवृत्त करत असल्याची घोषणा केली होती.

याच काळात मॅराडोना कोकेनच्या व्यसनात बुडाला. त्याच्यावर १९९१ मध्ये १५ महीन्यांची बंदी घालण्यात आली. आणि १९९४ च्या विश्वचषक स्पर्धेतून त्याला एफेड्रीन या ड्रगच्या सेवनासाठी बाद करण्यात आले होते. येथून त्याचे खासगी आयुष्यही ढासळले. हृदयाच्या िवकाराने त्याला २००० व २००४ मध्ये दवाखान्यात उपचार घ्यावे लागले.
२००४ मध्ये तर तो कृत्रिम श्वासोश्वासावर होता. २००५ मध्ये त्याच्यावर लठ्ठपणासाठी शस्त्रिक्रया करण्यात आली होती. मैदानावर मात्र त्याचे कौशल्य अजोड होते.

३० ऑक्टोबर १९६० रोजी हा विलक्षण प्रतिभेचा खेळाडू ब्युनोस आयर्स येथे जन्मला. वयाच्या १० व्या वर्षीच त्याने त्याच्या क्लबला सलग १३६ सामने िजंकायचा विक्रम करुन िदला. त्यामुळेच १६ वर्षाचा होण्याच्या आतच त्याला सिनियर संघात स्थान मिळाले होते. २७ फेब्रुवारी १९७७ रोजी त्याचे अर्जेंटीनासाठी पदार्पण केले. हंगेरीविरुध्दच्या मैत्री सामन्यात तो ६५ व्या मिनीटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. १९८१ मध्ये त्याने बोका ज्युनियर्स क्लबलाही विजेतेपद मिळवून िदले. त्यात त्याचा िरव्हर प्लेटविरुध्दचा गोल महत्त्वाचा ठरला होता. १९८२ च्या विश्वचषक स्पर्धेरत खेळल्यावर त्याला बार्सीलोना क्लबने आपल्या संघात घेतले. १९८४ पासून तो नापोलीसाठी खेळू लागला.

मात्र १९८६ च्या विश्वचषक स्पधेर्ने त्याला सुपरस्टार बनवले. त्या स्पधेत तो अर्जेंटीनासाठी प्रत्येक सामन्यात प्रत्येक मिनीट खेळला. नेतृत्व करता करता पाच गोलसुध्दा केले आणि पाच गोलसाठी मार्ग प्रशस्त केला. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंडवरील २/१ िवजयात त्याचा दुसरा गोल विलक्षण होता. हाफलाईनपासून मुसंडी मारत गोलरक्षक पीटर शिल्टनला चकवा देत त्याने अफलातून गोल केला होता. अनेकांनी ह्या गोलचे गोल ऑफ दी से्चयुरी असे वर्णन केले आहे. त्याच सामन्यात त्याचा पहिला गोल अतिशय वादग्रस्त ठरला होता कारण तो गोल करताना त्याने हाताचा वापर केल्याची तक्रार झाली होती. हँड ऑफ गॉड म्हणून आजही हा गोल ओळखला जातो. १९९० मध्ये त्याच्याच नेतृत्त्वात अजेंटीनी संघ विश्वचषक उपिवजेता ठरला आणि १९९४ मध्ये त्याला विश्वचषक अर्धवट सोडून परतावे लागले. त्याने ९१आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३४ गोल केले आहेत. पुढे सेव्हिला व नेवेल्स ओल्ड बॉईज आणि बोकासाठी खेळत तो १९९७ मध्ये निवृत्त झाला. २०१० च्या िवश्वचषक स्पधेर्वेळी तो अर्जेंटीना संघाचा मॅनेजर होता. सन २००० मध्ये त्याला महान पेले यांच्यासोबत ‘फिफा’ने प्लेयर ऑफ दी सेंच्युरीचा सन्मान िदला होता. त्याने जनतेची सर्वािधक मते मिळवली होती.

या महान खेळाडूच्या मागे विभक्त असलेली पत्नी क्लॉडिया आणि दोन कन्या आहेत.

ही बातमी पण वाचा : फूटबॉल सुपरस्टार दिएगो मॅराडोनाचे निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER