एमआयएमच्या प्रचाररॅलीत राडा

पैठणगेट येथे काही काळ होती तणावपूर्ण परिस्थिती

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमिन(एमआयएम) पक्षाचे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार नासेर सिद्दिकी यांनी शनिवारी दुपारी चार वाजता पैठणगेट येथून पदयात्रेला सुरूवात केली असता एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यंाच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. याक्षणी कार्यकर्ते काही वेळ आपापसात भिडले.

एमआयएमच्या उमेदवाराला या भागात प्रचार रॅली काढू नका असा दम भरला. त्यावेळी एमआयएम आणि कुरेशी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांच्या अंगावरही काही जण धावून गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सिद्दिकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. या घटनेनंतर पैठणगेट भागात चांगलाचा तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.