धनगर आरक्षणासाठी २५ सप्टेंबरला ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन – पडळकर

Gopinath Padalkar

धनगर समाजाची आरक्षणाची (Dhangar Community Reservation) मागणी मार्गी लावण्याच्या मागणीसाठी धनगर समाज २५ तारखेला राज्यात ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन’ करणार आहे, अशी घोषणा आमदार गोपीनाथ पडळकर (Gopinath Padalkar) यांनी केली आहे.

ते म्हणाले की, धनगर समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करतो आहे पण अजून त्याच्या हातात ‘एसटी’चा दाखल मिळालेला नाही. हे सरकार येऊन १० महिने झालेत पण सरकारने धनगर आरक्षणाबाबत एकही बैठक घेतली नाही. कोर्टात धनगर आरक्षणाची केस सुरू आहे तिथे सरकारने चांगला वकील दिला नाही, असा आरोप त्यांनी केला.

मागच्या सरकारने आदिवासींसाठी दरवर्षाला एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. २०१९ – २० हे पैसे व्यपगत झाले आहेत ते द्या, आणि धनगर व आदिवासींच्या योजना कार्यान्वित करा. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन धनगरांचे प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER