आदित्य ठाकरेंचा ‘इफेक्ट’, मुंबईत ८४ हजार २१० किलो प्लॅस्टिक जप्त

मुंबई :- पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन केल्याने मुंबईत आतापर्यंत ८४ हजार २१० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. या जप्ती कारवाईत चार कोटी ५४ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबईसह प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाची आजपासून सुरूवात

प्लॅस्टिकबंदी कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी होत नसल्याबाबत आ. आशिष शेलार, आ. पराग अळवणी यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती सभागृहास दिली.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईतील ५३ प्लॅस्टिक कारखान्यांना उत्पादन बंद करण्याचेही आदेश दिले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.