… तुम्ही बांधाल तेच तोरण, ठरवाल तेच धोरण; खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या समर्थनात लागले फलक

शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

Pankaja Munde

जळगाव :  भाजपाचे (BJP) दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी याबाबत लावलेल्या फलकावरून ‘कमळ’ (Kamal) गायब आहे. ‘नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’ असे म्हणत खडसेंच्या नव्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या निवासस्थानावर गर्दी केली आहे. त्यांना पक्षप्रवेशासाठी शुभेच्छा देत आहेत. मुंबईवरून काही निरोप आल्यास एकनाथ खडसे संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्याची तारीख याबद्दल खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या विश्वासू कार्यकर्त्याने सांगितले की, एकनाथ खडसे २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. समर्थकांना सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER