सीएए, एनआरसीवरून महापौर यांची कोंडी

Protest

कोल्हापूर : केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केलेल्या सीएए, एनआरसी कायद्याविरोधात कोल्हापुरात मोर्चा काढण्याचे नियोजन सुरू आहे. मोर्चाच्या तयारीसाठी महापौर निलोफर आजरेकर यांनी माहिती दिली होती. यावरुन मंगळवारी झालेल्या महासभेत विरोधी आघाडीने त्यांची कोंडी केली. दोन्ही कायद्यांबाबत पाच मिनिटे सभागृहाला माहिती देण्याची विरोधकांनी मागणी केली. त्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली. नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी हस्तक्षेप केल्यांतर या प्रकरणावर पडदा पडला.

उद्या कोल्हापुरात जावेद अख्तर यांची सभा

सुनील कदम यांनी लोकसभेने हा कायदा केला आहे. कायद्याविरोधात जनमत तयार करुन देशात अराजकता माजवली जात असताना शाहू महाराजांच्या समतेच्या भूमीत मोर्चासाठी महापौर कशा काय आवाहन करु शकतात. मुंबई, पुण्यानंतर बंगाली लोक कोल्हापुरात येवू लागले आहेत. काळम्मावाडी थेट पाइपलाइनसारख्या शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर भूमिका न घेता या कायद्याविरोधात घेतलेली भूमिका चुकीचे वाटते. या कायद्याबाबत सभागृहाला पाच मिनिटे निवेदन करावे अशी मागणी केली. विरोधी आघाडीच्या या मागणीने महापौर आजरेकर चांगल्याच गोंधळून गेल्या. त्यांनी नंतर भूमिका जाहीर करु असे, सांगितले. पण समाधान न झालेल्या विरोधी आघाडीच्या ठाणेकर, खाडे-पाटील, नकाते यांनी याबाबत अधिक विचारणा केली.

अखेर प्रा. पाटील यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करत
हा विषय सभागृहाचा नाही. यावर येथे चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी महापौर हसीना फरास यांनीही विरोधी आघाडीला विनंती केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.