कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नियोजन सुरू, बाळासाहेब थोरातांची माहिती

Balasaheb Thorat - Maharastra Today

मुंबई : राज्यातील नागरिकांचं लसीकरण लवकरात लवकर होण्याची गरज आहे. त्यासाठी एक रकमी पैसे देऊन लस खरेदी करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असं सांगतानाच लसीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच आणखी ऑक्सिजन बेड्स बाहेरून घेण्यात येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ही लाट थोपवण्यासाठी नियोज सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राज्यातील १८ वर्षावरील सर्वांच्या लसीकरणावरून बाळासाहेब थोरात म्हणाले की, लसीकरणाबाबत शासकीय स्तरावर नियोजन सुरू आहे. बाहेरून लसी आयात करण्याबाबतची चर्चाही सुरू आहे,तसेच कोरोनाची तिसरी लाट थोपवण्याची तयारी सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी ही राज्यांची आहे. मात्र लस उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच आता १८ ते ४४ वयोगटातील लोकांनाही लस देण्यात येणार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. शासकीय पातळीवर लसीकरणाचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

ऑक्सिजन प्लांट उभे करण्यासाठी जवळपास दीड महिना इतका वेळ लागू शकतो. ऑक्सिजनचे उत्पादन करण्यासाठी साखर कारखानेही काम करत आहेत. साखर कारखान्यांमधून ऑक्सिजन उत्पादन करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो, असं ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती बिघडली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते आजारातून लवकरच बाहेर येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button