
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या लॉकडाऊनमधून सरकारने शिथीलता देतांना राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसला जिल्ह्यातर्गंत प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मंडळाने सर्व गाड्या सज्ज करताना सॅनिटाईझ करुन प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकात आणून उभ्या केल्या. मात्र प्रवाशांच्या प्रतीक्षेत बस स्थानकात उभ्या असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाची एकही बस प्रवाशांना घेऊन जिल्ह्यात धावली नव्हती. मात्र, आता जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार बससेवा सुरू करण्यात येत आहे. एसटी प्रशासनाकडून जिल्ह्यातील ११ आगारांच्या माध्यमातून ४४ बसच्या २२७ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, संगमनेर शहर हॉट स्पॉट असल्यामुळे तेथील अकरा बसच्या माध्यमातून होणाऱ्या ५२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील माळीवाडा, तारकपूर या दोन स्थानकावरून बस सोडण्यात येत आहेत.
शुक्रवारी (२२ मे) सकाळी बसस्थानकात प्रवासी वर्गाअभावी शुकशुकाट पाहिला मिळत होता. निर्जंतुकीकरण केलेल्या बस अहमदनगर, श्रीरामपूरकडे जाणा-या प्रवाशाकरिता स्थानकात सज्ज होत्या. मात्र प्रवासी वर्ग बसस्थानकाकडे फिरकलाच नाही. त्यामुळे नियोजित फेºया रद्द कराव्या लागल्या. अहमदनगर व श्रीरामपूरकडे जाणा-या प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्येकी १२ फेºयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळच्या सुमारास प्रवासासाठी कोणीच प्रवासी न आल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या चेह-यावर चिंतेचे भाव दिसून येत होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला