राज्याचे नियोजित मुख्यमंत्री, युवानेते रोहितदादा पवारच!, सोशल मीडियावर ट्रेंड

Rohit Pawar - CM Yogi Adityanath

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होत असताना राजकीय कलगीतुरा रंगला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणिमहाविकास आघाडी सरकरमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी एक फेसबुक पोस्ट टाकून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सल्ला दिला आहे.

घाम गाळून महाराष्ट्र उभा करणाऱ्या मजुरांना शिवसेना-काँग्रेस सरकारने फसवल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. याच टीकेवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी योगी यांना काही प्रश्न विचारले आहेत. लॉकडाउन काळात मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. यासाठी उद्धव ठाकरेंना कधीही माफ केलं जाणार नाही असं म्हणणाऱ्या योगींवर रोहित यांनी ट्विटवरुन टीका केली आहे. यामध्ये रोहित यांनी महाराष्ट्राने या मजुरांची कशाप्रकारे काळजी घेतली हे सांगतानाच कामगारांवर फवारणी कोणी केली हे साऱ्या जगाने पाहिल्याचा टोलाही लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडे मी मागणी करतो की जेव्हा हे मजूर महाराष्ट्रामध्ये परत येतील तेव्हा त्यांची नोंदणी केली जावी. पोलिसांना महिती देण्याबरोबरच आरोग्य चाचण्या घेण्यात याव्यात. कारण या गोष्टींबद्दल उत्तर प्रदेश सरकारला काहीही देणे घेणे नसल्याचे आपण सर्वांनी पाहिलं आहे. महाराष्ट्राचे हृदय खूप मोठं आहे हे आम्ही वेळोवेळी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप लावण्यापेक्षा करोनाविरुद्धच्या लढामध्ये एकत्र या आणि चाचण्यांची संख्या वाढवा. तसेच खालच्या स्तरातील नागरिकांचीही काळजी घ्या, असा सल्ला रोहित यांनी योगी सरकारला दिला आहे.

त्यांच्या या पोस्टनंतर नेटकाऱ्यानी रोहित पवारांच्या या विधानाला समर्थन देत त्यांच्या बाजूने कमेंट्स करणे सुरु केले आहे. राज्याचे नियोजित मुख्यमंत्री, युवानेते रोहितदादा पवारच!, असे एकाने म्हटले आहे. तर, दादा, या परप्रांतीयांना पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश नाहीच दिला तर उत्तमच! महाराष्ट्र सरकारने कोणत्याही अमहाराष्ट्रीय नागरिकाला महाराष्ट्रात प्रवेश देताना त्यांची नोंदणी केली जावी. किती लोकांना घेऊ शकतो यावर बंधन असावं. #महाराष्ट्रातप्रवेशपरवाना हवाच. यासाठी आपण महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करावा ही विनंती. जय महाराष्ट्र असे एकाने म्हटले आहे.

दादा, आता महाराष्ट्रातील मुलांना रोजगाराच्या संधी आहेत तरी सर्व महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळाल्यावरच शासनाने परप्रांतीयांना रोजगाराची संधी द्यावी. असेही एकाने म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER