पिझ्झा- बर्गरची होम डिलिव्हरी होते, गरिबांच्या रेशनची का नाही? – केजरीवाल

Arvind Kejriwal - PM Narendra Modi

दिल्ली : दिल्ली सरकारच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राने स्थगिती दिली. याबद्दल संताप व्यक्त करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणालेत – या देशात पिझ्झा-बर्गरची, स्मार्ट फोन व कपड्यांची होम डिलिव्हरी होऊ शकते. तर गरिबांच्या घरी रेशनची होम डिलिव्हरी का नाही होऊ शकत? संपूर्ण देश जाणू इच्छित आहे की तुम्ही ही योजना रद्द का केली?

ऑनलाईन पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले – पंतप्रधान मोदीजी तुम्हाला नमस्कार, आज मी अतिशय दुःखी आहे आणि मी थेट तुमच्याशी बोलू इच्छित आहे. माझ्याकडून काही चूक झाली, तर मला माफ करा. दिल्लीत पुढील आठवड्यापासून ‘घर घर रेशन’ पोहचवणे सुरू होणार होते. सर्व तयारी झाली होती, टेंडर झाले होते. तुम्ही दोन दिवस आधी याला स्थगिती दिली! तुम्ही असे का केले?

७५ वर्षांपासून गरीब जनता रेशन माफियांची शिकार
७५ वर्षांपासून या देशातील गरीब जनता रेशन माफियांची शिकार होते आहे. मागील ७५ वर्षांपासून प्रत्येक महिन्याला कागदपत्रांवर जनतेच्या नावाने रेशन जाहीर होतं; पण त्यांना ते मिळतच नाही. बहुतांश रेशनची चोरी होते.

परवानगी पाच वेळा घेतली होती
आम्ही केंद्र सरकारकडून यासाठी परवानगी घेतली नाही, असे कारण देऊन तुम्ही आमची योजना रद्द केली हे चूक आहे. आम्ही एकदा नाही तर पाच वेळा परवानगी घेतली आहे.

रेशन माफियांबद्दल इतकी सहानुभूती का?
“तुम्ही असेदेखील सांगितले आहे की, रेशन दुकानदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात या योजनेविरोधात खटला दाखल केला आहे. त्यामुळे ही योजना रद्द केली जात आहे. या मुद्यावरून तुम्ही योजना रद्द कशी काय करू शकता? हे रेशन दुकानदार या योजनेविरोधात उच्च न्यायालयात स्थगिती घेण्यासाठी गेले होते. उच्च न्यायालयाने स्थिगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली नाही, तर तुम्ही या योजनेवर स्थगिती कशी आणली? तुम्हाला या रेशनवाल्यांबद्दल इतकी सहानुभूती का आहे? तुम्ही रेशन माफियांसोबत उभा राहिलात, तर या देशातील गरिबांसोबत कोण उभं राहील?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button