महाराष्ट्राकडे खंबीर नेतृत्वच नाही; पीयूष गोयल यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Piyush Goyal - Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रविवारी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या दिरंगाईवर टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबत बोलताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रात प्रशासन कोलमडलं आहे आणि राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा:-श्रमिक ट्रेनः मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोपाला रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडून करारा जवाब; मध्यरात्री ट्विटरवार 

महाराष्ट्र सरकारनं श्रमिक रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याच्या केलेल्या आरोपाचं गोयल यांनी खंडन केलं. तसंच हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं. “करोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही. याव्यतिरिक्त ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्य सचिव आणि नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते,” असा आरोपही एका वृत्तवाहिनीशी बोलताना गोयल यांनी केला .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER