लोकल गाड्या वाढवल्या, उद्यापासुन 350 लोकल गाड्या धावणार

लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनाच प्रवेश

Piyush Goyal

मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. चोवीस तास धावती राहमारी मुंबई गेल्या 3 महिन्यांपासून ठप्प पडली होती. आता मुंबईची लाईफलाईन पुन्हा रुळावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला काही रेल्वे गाड्या सुरू करून मंत्रालयीन कर्मचा-यांनाच या लोकल गाड्या सुरू केल्या होत्या. त्यात काही दिवसांनी बदल करून अजून काही सरकारी कर्मचा-यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला.

आता उद्यापासून पुन्हा 350 लोकल गाड्या रुळावरून धावणार असल्याचे केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे.

या लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र लोकल सेवा बंदच राहणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत उद्यापासून 350 लोकल धावणार आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचार्‍यांना प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्यांना मात्र अद्याप लोकलमधून प्रवास करता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER