श्रमिक ट्रेनः मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोपाला रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडून करारा जवाब; मध्यरात्री ट्विटरवार

Piyush Goyal on CM Thackeray

मुंबई:लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतिय स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गृहराज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष श्रमिक रेल्वे चालवण्यात येत आहे. आतापर्यंत सहा ते सात लाख मजुरांनी महाराष्ट्रातून आपल्या राज्यात गेले आहेत. परंतू, महाराष्ट्रात अजूनही मजूर ट्रेनच्या प्रतिक्षेत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले व अद्यापही रेल्वेकडून दिवसाला ८० ट्रेनची आवश्यकता असताना केवळ ५० टक्के म्हणजे ४० ट्रेन पाठवल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या फेसबुक लाईव्हद्वारे केला. यावरुन आता रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री यांच्यात संघर्ष पेटला आहे.

मध्यरात्रीचे 12 ते चक्क 3 वाजेपर्यंत राज्य मुख्यमंत्री विरुद्ध केंद्रिय रेल्वे मंत्री गोयल असा वाद पेटलेला पाहायला मिळाला.

महाराष्ट्राला 125 गाड्यांची आवश्यकता असताना केंद्राकडून ट्रेन येत नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना मध्यरात्रीच करारा जबाब दिला.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या आरोपानंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी रात्रीचे 12 वाजता ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी एका तासात मजुरांची यादी तयार ठेवावी रेल्वे त्यांच्यासाठी तयार असल्याचे ट्विट करून म्हटले.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोपानंतर महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यात तयार आहेत. राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवावी असे आवाहन गोयल यांनी केले होते.

त्यानंतर रात्री १२ वाजता पीयूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करुन रात्रीचे बारा वाजले आहेत आणि ५ तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या १२५ ट्रेनची माहिती आणि प्रवाशांची यादी आली नाही. तरीही मी अधिकाऱ्यांना प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असा आदेश दिल्याचं त्यांनी सांगितले.
असे ट्विट गोयल यांनी केले.

त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास गोयल यांनी ट्वट करून आम्ही १२५ ट्रेनची तयारी केली असताना महाराष्ट्र सरकारने ४६ गाड्यांची यादी पाठवली असून त्यापैकी ४१ ट्रेन सोडाव्या लागतील कारण उर्वरित ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिसा याठिकाणच्या आहेत. तिथे अम्फान चक्रीवादळामुळे ट्रेन चालवण्यास परवानगी नसल्याचं पियूष गोयल यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER