रेल्वेत एकाही प्रवासी मजुराचा अन्न-पाण्याविना मृत्यू झालेला नाही-पीयूष गोयल

Piyush Goyal claimed-that-no-one-died-lack-of-food-and-water

मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली . या संकट काळात गोर -गरीब आणि मजुरांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे .लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरुन देशातील वातावरण चांगलच तापलं होतं. रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवासी मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जेवण आणि पाणी न मिळाल्यानं गरीब मजुरांचा मृत्यू झाला असा आरोप केला जात आहे. मात्र, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वेमध्ये एकाही प्रवासी मजुराचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा दावा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा:- विशेष श्रमिक गाड्यांबाबतची माहिती तपासून घ्या; रेल्वेच्या प्रवक्त्याचे प्रियंकाला उत्तर  

गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत म्हटले की , “देशात कोणत्याही रेल्वेला पोहोचण्यासाठी ७ किंवा ९ दिवस लागलेले नाहीत. शिवाय एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यानं झालेला नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे. रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण आणि १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आल्या. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचं प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के इतकंच आहे, असे ते म्हणाले .

लॉकडाउनच्या काळात देश शभरात विविध राज्यात काम करत असणारे मजूर वेगवेगळ्या भागात अडकले. लॉकडाऊनचा वाढता कालवधी लक्षात घेत मजूर आपल्या घरी पायी चालत निघाले. अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. यानंतर देशात संतापाची लाट उसळली. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारनं लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या गाड्यांमध्ये ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व आरोपांवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तरं दिली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER