IPL 2020: चावलाला आयपीएलमधील मलिंगाचा सर्वात मोठा गोलंदाजीचा विक्रम मोडण्याची संधी

CHAWALA- MALINGA

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) १३ व्या सत्रात अमित मिश्रा दुखापतीमुले बाहेर झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) मधील अनुभवी लेगस्पिनरकडे या मोसमात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडण्याची संधी होती. या हंगामात न खेळणार्‍या मलिंगाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर अमित मिश्रा आहे, परंतु पाच सामने खेळल्यानंतर तोही दुखापतग्रस्त झाला असून तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता मलिंगाचा रेकॉर्ड ब्रेकिंगचा कारनामा चेन्नई सुपर किंग्सचा पियुष चावला करू शकतो जो सध्या या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

वैयक्तिक कारणांमुळे यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वी मलिंगाने माघार घेतली. मलिंगाने १२२ आयपीएल सामन्यांत १७० बळी घेतले असून या स्पर्धेत घेतल्या गेलेल्या सर्वाधिक विकेट आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने यंदाच्या हंगामात १५० सामन्यात १६० बळी टिपले होते, परंतु बोटाच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातूनही त्याला बाहेर जावे लागले. शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात नितीश राणाने शॉट मारलेला चेंडू पकडला तेव्हा अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. मात्र त्यानंतरही त्याने गोलंदाजी सुरूच ठेवली आणि शुभमन गिलची विकेट घेतली.

शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १४ धावा देऊन एक बळी घेतला. पण या दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले. अमित मिश्रा व्यतिरिक्त चेन्नईचा ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि पियुष चावलादेखील मलिंगाचा विक्रम मोडण्याच्या शर्यतीत होते पण वैयक्तिक कारणांमुळे हरभजनने आयपीएल सुरु होण्यापूर्वी माघार घेतली होती तर अमित मिश्रा दुखापतीमुळे बाहेर झाला. आता मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी चावलाकडे उरली असून त्याला त्याच्या संघाच्या आगामी सामन्यांत शानदार कामगिरी करावी लागेल.

चावलाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १५७ सामन्यात १५० बळी घेतले आणि या मोसमात त्याने पाच सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या आहेत. चावलाने १६२ सामन्यात १५६ बळी घेतले असून मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी १५ बळी आवश्यक आहेत, जे अशक्य नाही. गेल्या डिसेंबरमध्ये चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल -२०२० च्या लिलावात चावला याला खरेदी करण्यासाठी ६.७५ कोटी रुपये खर्च केले आणि या मोसमात त्याला ही किंमत सार्थकी आणण्याची संधी असून त्याच्या संघाला प्लेऑफमध्ये आणण्याची संधी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER