पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही , चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये : चंद्रकांत खैरे

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. जलील यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओवरुन मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे (Shivsena) वाघाचे चिन्ह आहे. यावर शिवसेनेने सपष्टीकरण दिले .

सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांची असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही, असे वक्तव्य माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले. ते औरंगबादमध्ये बोलत होते .

तसेच, औरंगाबादचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे चुकून निवडून आलेले आहेत. आता लोकांना पश्चात्ताप होत आहे. जलील हे दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही खैरे यांनी जलील यांच्यावर केला.

सध्या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हवेत फिरवलेला पिस्तूल हा गाडीत बसलेल्या व्हीआयपी लोकांचा असेल,पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही. आम्हाला राग येतो पण आम्ही शांत बसतो. हा माणूस चुकून निवडून आला. आता सगळे लोक पश्चात्ताप करतात. जलील दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात, असे खैरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER