मोदी लाट आणि खोट्या आरोपांमुळेच पिंपरी महापालिकेची निवडणुक हारलो – अजित पवार

Ajit Pawar

पिंपरी :- मोदी लाट आणि विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आमचा पराभव झाला, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

ते पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार असून ढेपाळलेली संघटना अ‍ॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे. मागील चुका टाळून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालीकेेत अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती. आज जो काही शहरात विकास पाहायला मिळतोय तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे. आम्ही सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचे सर्व विकास कामे मार्गी लावली, अस दावा त्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. वाहने जाळणे, तलवारी घेऊन फिरणे, दहशत माजविणे असे प्रकार होत आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करताना आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुंडगिरी मोडीत काढताना राजकीय हस्तक्षेप होणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्णय घ्यायला हवेत, असे पवार म्हणाले.

बैठकीत कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधीपक्षनेते पक्षनेते राजू मिसाळ उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवार दिल्लीचे नेते, त्यांच्यावर टीका करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER