पिंपरी-चिंचवड मनपा : भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, चौकशी लावतो – अजित पवार

Ajit Pawar

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बरेच काही ‘चालू’ असल्याची चर्चा आहे. बोगस ‘एफडीआर’ प्रकरणाबाबत केवळ माहिती न देता त्याचे पुरावे द्या, महापालिकेतील कारभाराची चौकशी लावतो, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (शुक्रवारी) दिला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात ‘हेल्थ-365′ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले. ग्राम सुरक्षारक्षक दलाच्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी कोविडच्या काळात भ्रष्टाचाराची प्रकरणे सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उजेडात आणली आहे. त्याबाबत आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. महापालिकेच्या काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक करत ‘बोगस एफडीआर’ सादर केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. यानंतरही ठेकेदारांना पाठीशी घालणे सुरू आहे. याबाबत विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना पवार यांनी पुरावे देण्याचे आव्हान दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER