पिंपळ वृक्ष – बोधिद्रुम महावृक्ष !

पिंपळ वृक्ष

वड पिंपळ उदुंबर हे सर्व वृक्ष आपल्याला धार्मिक महत्त्व आहे. पिंपळाला (Sacred Fig) देखील खूप महत्त्व आहे. शनि मंदिराजवळ अनेक ठिकाणी पिंपळाचे वृक्ष असतेच. पिंपळाची मुळे खूप खोलवर जमिनीत जातात. पिंपळाला अश्वत्थ बोधिवृक्ष असेही म्हटले जाते. पिंपळाचे पान पुस्तकात ठेवून त्याला जाळी येईस्तोवर वाळविणे हे प्रयोग शाळेत असतांना अनेकांनी नक्कीच केले असेल. अग्रभागी लांब व हृदयाकृती असलेली पिंपळाची पाने जाळी आल्यावर सुंदर दिसतात.

आयुर्वेदात वड उंबराप्रमाणे पिंपळाच्या खोडाची साल, फल शृंग क्षीर औषधाकरीता वापरली जाते. पिंपळाची साल व्रण भरून काढणारी आहे. वड पिंपळ उदुंबर पारिष प्लक्ष या वृक्षांची साल एकत्र करून बनविलेला काढा जखम धुण्यास वापरतात. डायबिटीक वूंड असो वा अपघात मारामुळे झालेली जखम असो पूययुक्त व्रण असो हा काढ्याने जखम स्वच्छ करून लेप वा तेल लावतात. जखम लवकर भरण्यास खूप फायदा होतो. जखमेवर या सालीच्या चूर्णाचे अवचूर्णन करतात.

  • वर्ण उजळ करण्याकरीता लेपामधे पिंपळाचे शृंग ( न उमलेले कळीसारखे दिसणारे पर्ण) वापरतात.
  • पाचही महावृक्षाचा सालींचा काढा, त्यालाच पंचवल्कल क्वाथ असेही म्हणतात, योनीभागी खाज सुटणे, दुर्गंध येणे अथवा
  • पांढरे पाणी जाणे अशा विकारां मधे धावनाकरीता वापरल्यास लगेच आराम पडतो.
  • पिंपळाच्या पानावर दर रविवारी वरणभात तूपाचे जेवण लहान मुलांची बुद्धी वाढविणारे आहे.
  • घोळणा फुटणे किंवा नाकातून रक्तस्राव होत असल्यास पिंपळाच्या पानांचा रस नाकपुडीत घातल्यास रक्त थांबते.

आपल्याकडे पिंपळ वड उदुंबर यासारख्या वृक्षांची पूजा करण्यामागचे पौराणिक महत्त्व आहे. मानवाला या वृक्षांची अगणित मदत ऑक्सीजन स्वरूपात असो वा औषधी स्वरूपात मिळतच असते. त्यामुळे या वृक्षांसमोर कितीही नतमस्तक झालो तरी कमीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER