प्रियंका गांधींची मध्यस्थी, राहुल गांधींच्या खास संदेशानंतर पायलट यांचे बंड थंडावले!

Rahul Gandhi & Priyanka Gandhi & Sachin Pilot

जयपूर : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा रोवल्याने मध्यप्रदेशच्या धर्तीवर राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अल्पमतात येऊन पडेल अशा चर्चांना उत आला होता. तसेच पायलट आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या. मात्र, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वेळीच मध्यस्थी केली व पायलट यांची समजूत काढम्याचा प्रयत्न केला तसेच, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पायलट यांना खास संदेश धाडला असल्याचे समजते. तसेच त्यानंतर सचिन पायलट यांचे बंड थंडावल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरुन अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. तसंच दुसरीकडे सचिन पायलट हे सकाळपासून राहुल गांधी यांच्या संपर्कात होते. सचिन पायलट यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, त्यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. तर प्रियंका गांधी यांनीही मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.

दरम्यान, अजय माकन यांनी, ‘काँग्रेसकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही हा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठविला आहे. गहलोत सरकार स्थिर आहे, बहुमत सिद्ध करेल आणि गहलोत यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्त्वाचा विश्वास आहे’, असं स्पष्ट केले.तसंच, बंडखोर नेत्यांशीही सहानुभूतीपूर्वक वागले पाहिजे असे निर्देश राहुल गांधींनी दिले आहे, अशी माहितीही माकन यांनी दिली.

तर दुसरीकडे राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या निवास्थानी बोलावल्या बैठकीला 100 पेक्षा जास्त आमदार उपस्थितीत होते. परंतु, या बैठकीला सचिन पायलट यांचे समर्थक गैरहजर होते.दरम्यान, सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे.सचिन पायलट परत काँग्रेसमध्ये येतात की वेगळा निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER