‘तो’ अपघात वैमानिकाच्या आणि व्यवस्थेच्या चुकीमुळे

Pilots, DGCA to Blame For Ghatkopar Plane Crash

मुंबई : घाटकोपर येथे जून २०१८ ला खाजगी विमान कोसळून झालेला अपघात वैमानिकाची चूक आणि हवाई वाहतूक नियामक संचालक महासंचनालयाच्या दोषपूर्ण निरीक्षणामुळे झाल्याचा निष्कर्ष या अपघाताची चौकशी करणाऱ्या विमान अपघात शोध संस्थेने काढला आहे. या अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. अहवालात म्हटले आहे की, वैमानिकांनी आपात्कालीन स्थितीची माहिती हवाई वाहतूक खात्याला दिली नव्हती. शिवाय विमानातील कर्मचाऱ्यांना (चालकांना) कॉकपीटची माहिती नव्हती. ते वारंवार कॉकपीटमधील यंत्रणेची अभियंत्यांकडून माहिती घेत होते.

उड्डाणादरम्यान सहायक वैमानिक वैमानिकाला हवामानाबाबत माहिती घेण्यास सांगत होता. रेकॉर्डिंगवरून लक्षात येते की, वैमानिकाने सहवैमानिकाला यूवाय एव्हिएशनच्या कर्मचार्‍यांना फोन करून मुंबई आणि सूरत विमानतळावर समन्वय साधण्यास सांगितले; पण सहवैमानिकाला ते जमले नाही.

विमान निर्धारित वेळेत अपेक्षित उंची गाठू शकले नव्हते या स्थितीत वैमानिकांनी विमान परत आणायला पाहिजे होते; पण विमानाच्या डाव्या इंजिनाला आग लागण्याचा इशारा मिळेपर्यंत उड्डाण सुरूच ठेवले. चालक दल जागरूक नसणे, खराब हवामान आणि इंजिनातील बिघाडामुळे अपघात झाला, असे अहवालात म्हटले आहे; मात्र, या अपघातासाठी फक्त वैमानिकालाच दोष देता येणार नाही. वैमानिकाला कॉकपीटची माहिती नव्हती हे खरे असले तरी, विमानाची स्तिथी आणि अनेक वर्षांनंतर होणारा विमानाचा वापर याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही अहवालात म्हटले आहे.

पुण्याजवळ गडावरून कोसळल्याने ट्रॅकिंग करणाऱ्या तरुणीचा मृत्यू