कोल्हापुरात पिकली मोत्याची शेती : अभिनव प्रयोग

Dilip Kamble

कोल्हापूर : हिरे, जवाहीर, सोन्याबरोबरच मोत्यांनाही विशेष महत्त्व आहे. अस्सल मोती चिरकाल टिकतो. त्यामुळे भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोत्याला प्रचंड मागणी आहे. समुद्रातील शिंपल्यात तयार होणाऱ्या नैसर्गिक मोत्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे सध्या गोड्या पाण्यात मोत्यांची शेती केली जात आहे. सडोली दुमाला येथील दिलीप कांबळे या तरुण शेतकऱ्याने शेतातून मोती पिकवले आहेत.

स्वाती नक्षत्रातील पावसाच्या पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला, की त्यातून मोती तयार होतो, असे म्हणतात. वास्तविक पाण्याचा थेंब नव्हे, तर दगड, रेतीचा गोळा शिंपल्याच्या आतमध्ये बंद झाला, की शिंपला त्याच्याभोवती विशिष्ट चमकदार रसायनाचे आवरण तयार करतो. त्यालाच मोती म्हणतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त समुद्रातच मिळणारे मोती आता कृत्रिमरीत्या तयार करता येऊ लागले आहेत.

महावितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत असणारे दिलीप यांना शेतीतील नवीन प्रयोग पाहताना मोती शेतीची माहिती मिळाली. सर्च करता – करता त्यामध्ये आवड निर्माण झाली आणि मोत्यांचीच शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांनी मोती शेतीविषयक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे एक-दोन प्रयोग फसले, तरीही हार न मानता पुन्हा 2018 मध्ये केंद्र सरकारचे ‘सीफा’ या वर्गाचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या वडगाव आणि सडोली, हळदी येथे त्यांचे दोन प्रकल्प आहेत. हळदीतील प्रकल्प पूर्णत्वास आला असून या आठवड्यातच शिंपल्यातून मोती काढण्याचे काम सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER