पिकासोच्या पेंटिंगच्या तस्करीचा आरोप; ४१० कोटी दंड !

Picasso painting

मॅड्रिड : पिकासोचे पेंटिंग तस्करी करून देशाबाहेर नेण्याच्या प्रयत्नात एका अब्जाधीशाला न्यायालयाने ४१० कोटी रुपये दंड आणि १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपीचे नाव जॅमी आहे. २०१५ ला फ्रान्सच्या कोरसिका बेटावर त्याच्या याटमध्ये पोलिसांना पिकासोचे पेंटिंग सापडले. हे पेंटिंग तस्करी करून देशाबाहेर नेट होता या आरोपात त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता त्याचा आता निकाल लागला आहे. या पेंटिंगची किंमत २०५ कोटी रुपये असून ते सध्या मॅड्रिडच्या सोफिया वस्तुसंग्रहालयात ठेवले आहे.

जॅमी हे पेंटिंग लंडन येथे लिलावात ती विकण्यासाठीनेट होता. स्पेनच्या नियमानुसार कोणतीही १०० वर्षांपेक्षा जुनी वस्तू राष्ट्रीय संपत्ती ठरते. त्या वस्तूच्या निर्मात्याची आणि प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. जॅमीने अशी परवानगी घेतली नव्हती, असा आरोप आहे.

जॅमीने त्याच्यावरचा आरोप फेटाळला आहे.

जॅमीने म्हटले आहे की, मी हे पेंटिंग मी स्वित्झर्लंड येथे विकत घेतले असल्याने त्याच्या तस्करीचा आरोप निराधार आहे.