फुले-आंबेडकरांचे फक्त नाव घेऊन भागणार नाही – शरद पवार

Sharad Pawar

मुंबई :- आज फुले-आंबेडकरांचे फक्त नाव घेऊन भागणार नाही; फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवावी लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानताना ते म्हणाले – ५० वर्षांपासून राजकारणात काम करतो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने ही संधी दिली म्हणून इथपर्यंत येता आले.

जी विचारधारा आपण स्वीकारली, जे सूत्र स्वीकारले त्या मार्गाने जायचे असते. शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथे तुम्हाला समजते, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे. जागृत राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे.

मुंबईत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी ‘गेट ऑफ इंडिया’ उभारण्यात आले. ते भारतात आले, तेव्हा त्या गेटजवळ एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. पंचम जॉर्ज यांनी खाली उतरून त्यांची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतीबा फुले होते. त्यांच्या हातात पत्र होते. त्यात संकरित वाण तयार करण्याची मागणी होती. दुसरी मागणी दुग्ध व्यवसायासंदर्भातील होती. संकरित गाई निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली होती, असे पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER