
बॉलिवूडमधील अभिनेत्री कॅटरीना कैफची (Katrina kaif) डुप्लिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री झरीन खानने (Zareen Khan) नुकतेच एक अत्यंत बोल्ड फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे स्वतः झरीननेच तिच्या सोशल मिडियावर अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो अपलोड केल्याबरोबर यूजर्सनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा भडिमार केला आहे. एवढेच नव्हे तर तिचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअरही केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे सिनेमात काम नसले तरी झरीन चांगलीच चर्चेत आली आहे.
कॅटरीना कैफबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने (Salman Khan) त्याच्या ‘वीर’ सिनेमात कॅटरीनाप्रमाणे दिसणाऱ्या झरीन खानला नायिका बनण्याची संधी दिली होती. पहिला सिनेमा सलमान खानसोबत मिळाला असला तरी झरीन बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकली नाही. तिच्याकडे कॅटरीनाची डुप्लिकेट म्हणूनच पाहू लागले होते. याबाबत झरीन खानने नेहमीच नाराजीही व्यक्त केली. पण तिच्या नाराजीला बॉलिवूडमध्ये कोणी भीक घातली नाही. झरीन खानला एकही मोठा आणि चांगला सिनेमा मिळाला नाही. सतत प्रयत्न करीत राहूनही काम मिळत नसल्याने तिने आता बोल्ड फोटो शूटचा आधार घेतल्याचे बॉलिवूडमध्ये (Bollywood) म्हटले जाऊ लागले आहे.
झरीन खानने नुकतेच बाथटब मध्ये फोटोशूट केले. या फोटोशूटमधील तीन फोटो झरीनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. या तिन्ही फोटोंमध्ये झरीन पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये झोपलेली दिसत आहे. तिन्ही फोटोत तिने वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. या फोटोसोबत झरीनने लिहिले आहे, ‘ते विचारतात, तुझी सुपर पॉवर काय आहे? मी म्हणते, मी एक स्त्री आहे. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. ’तिच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळू लागले आहेत. आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त यूझर्सनी हे फोटो लाईक केलेले आहेत. एकूणच झरीन कामामुळे नव्हे तर तिच्या वेगळ्या सुपर पॉवरमुळे चर्चेत राहाण्याचा प्रयत्न करीत असल्याचेच या फोटोशूटवरून दिसून येत आहे.
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला