गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत व्हायरल झालेत गुन्हेगारांचे फोटो!

Anil Deshmukh

औरंगाबाद :  गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नुकतेच औरंगाबाद येथे दौऱ्यावर आले होते. विश्रामगृहावर भेटून लोकांनी त्यांना निवेदन दिले. यात देशमुख यांच्यासोबत काही गुन्हेगारांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्यासोबत ज्या गुन्हेगारांचे फोटो व्हायरल झाले आहेत त्यात – एकावर ५०० ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे.

दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीचीदेखील कारवाई प्रस्तावित आहे. तर आणखी एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपाने यावर टीका केली. यावर एका वृत्तवाहिनीवर बोलताना अनिल देशमुख यांनी खुलासा केला की, त्या दिवशी मला सात-आठशेपेक्षा जास्त लोकांनी भेटून निवेदन दिले. मी सर्वांना ओळखत नव्हतो.

आजकाल लोक निवेदन देण्याआधी फोटो काढतात त्यामुळे असे होते. मी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, मला भेटणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून सोडत जा. काळजी घ्या. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत एका गुन्हेगाराचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांचाही एका गुन्हेगारांसोबत फोटो दिसला होता. मात्र या फोटोत गृहमंत्री गुन्हेगारांच्या मधे उभे आहेत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER