पतौडी पॅलेसमध्ये फोटो शूट केले सारा अलीने

Sara Ali Khan

सोशल मीडियाचा वापर ज्येष्ठ कलाकारांपेक्षा तरुण कलाकार मोठ्या प्रमाणावर करतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही कोट्यावधींच्या आसपास असते. हे कलाकार सोशल मीडियावर पिकनिकपासून बिकिनीतीली फोटोंपासून फोटोसेशनपर्यंत सगळ्या गोष्टी फॉलोअर्ससोबत शेअर करीत असतात. या कलाकारांनी एखादा फोटो टाकला की त्यावर लाईक्सच्या उड्या पडतात. या नव्या कलाकारांमधील सैफ अलीची (Saif Ali Khan) मुलगी सारा अली खानही (Sara Ali Khan) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. साराने नुकतचे त्यांच्या भोपाळ येथील खानदानी पतौडी पॅलेसमध्ये (Pataudi Palace) विंटर फोटो सेशन केले असून सध्या ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

सारा अली ट्रेडिशनल कपड्यांसोबत मॉडर्न कपड्यांमध्येही स्वतःचे वेगवेगळे फोटो काढून शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वी सारा त्यांच्या पतौडी पॅलेसमध्ये गेली होती. याच पॅलेसमध्ये सैफ अलीने त्याच्या वादग्रस्त तांडव वेबसीरीजचे शूटिंग केले होते. पतौडी पॅलेसमध्ये गेल्यानंतर साराने ट्रेडिशनल कपड्यांबरोबरच अत्यंत मॉर्डन पद्धतीने ड्रेस घालून फोटोशूट केले आहे. पतौडी पॅलेसच्या बाल्कनीत फोटोशूट करताना सारा दिसत असून एका फोटोत तिने कंबरेच्या थोडा खाली येईल इतका मोठा स्वेटर घातला असून पायात वरपर्यंत बूट घातलेले दिसत आहेत. यात ती अत्यंत आकर्षक दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना साराने लिहिले आहे ‘स्वेटर डेज आणि विंटर डेज। सरसों का साग आणि गोल्डन डेज’. हा फोटो साराने सोशल मीडियावर शेअर करताच काही तासातच लाखोंच्या वर लाईक्स मिळालेले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER