कुणाल कामरा-संजय राऊत यांच्यातील ‘जेसीबी’ भेटीवरून कंगनाचा पुन्हा संताप अनावर

Kangana Ranaut - Sanjay Raut - Kunal Kamra

मुंबई :- सध्या सोशल मीडियावर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या झालेल्या भेटीची चर्चा रंगली आहे . कुणालच्या ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये कुणालने राऊतांना जेसीबी भेट दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. मात्र, यावर अभिनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच संजय राऊत आणि कुणाल कामरा यांच्यावर निशाणादेखील साधला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. जेसीबी लावून हे बांधकाम पाडण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने राऊतांना जेसीबी भेट दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्यावर कंगनाने त्यावर संताप व्यक्त केला .

भलेही मला प्रचंड मोठा मानसिक त्रास देण्यात आला. भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या माझं खच्चीकरण करण्यात आलं. पण यातून महाराष्ट्र सरकार आणि त्याची अकार्यक्षमता व राजकीय डावपेच दिसून आला. त्यांच्या भोळेपणावरील पडदा दूर होताना दिसतोय. माझ्या घरावरील अवैध बांधकाम म्हणत केलेल्या कारवाईची अशी चेष्टा? यावरुनच सगळं स्पष्ट होते, असे ट्विट कंगनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER