फोन टॅपिंग : रश्मी शुक्ला यांना पोलिसांनी बजावला दुसऱ्यांदा समन्स

Maharashtra Today

मुंबई :- गेल्या महिन्यात ‘फोन टॅपिंग’ प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. यात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महत्त्वाची भूमिका होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना दुसऱ्यांदा समंस बजावला (Rashmi Shukla summoned by police for second time)आहे.

सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवून २८ एप्रिलला जबाब नोंदविण्यासाठी मुंबईत उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. यावर शुक्ला यांनी मेल पाठवून सध्याच्या स्थितीत चौकशीला उपस्थित राहणे शक्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सायबर पोलिसांनी साेमवार, ३ मेपर्यंत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हजर राहावे, असे समंस त्यांना दुसऱ्यांदा बजावले होते.

शुक्ला यांनी इमेल पाठवून सांगितले होते की, सध्याची कोविड स्थिती आणि हैद्राबादमधील कामाचा व्याप पाहता मुंबईला प्रवास करून चौकशीला उपस्थित राहणं शक्य नाही. मात्र चौकशी संदर्भातील प्रश्नावली मला पाठवून द्या, मी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच या प्रकरणी दाखल एफआयआरची प्रतही पाठवून द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शुक्ला यांनी त्यांचा मेल आयडी आणि लँडलाईन क्रमांकही दिला आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या ‘टॉप सिक्रेट’ कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचे रॅकेट उघडकीस आणले होते. फडणवीस यांनी आरोप केला होता की, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलीस अधिकारी इच्छित स्थानी पोस्टिंग मिळवले आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.

शुक्ला या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चौकशीला मुंबईला येण्यास असमर्थ असल्याचे कळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button