मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनद्वारे चर्चा

CM Uddhav Thackeray- Devendra Fadnavis.jpg

मुंबई : मराठा आरक्षणावर (Maratha reservation) स्थगिती आल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी माझ्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मराठा आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, हे आश्वस्त केले, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

दरम्यान मराठा आरक्षणप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष २०२०-२१ साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आले आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही; पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ पुढची सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER