आपातकालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून फायझरच्या लसीला मान्यता

Pfizer BioNTech - Covid 19 Vaccine

जिनिव्हा : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनावरील (Corona) लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी बातमी आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फायझर अँड बायोएनटेकच्या कोरोनावरील लसीला मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी फायझर (Pfizer) अँड बायोएनटेकच्या (BioNTech) लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.

तर दुसरीकडे आता भारतात केंद्र सरकारकडून सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर फायझरकडूनही आपातकालीन वापरासाठी लशीला परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. आज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची कोरोना लसीसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत तीन कंपन्यांच्या डेटाचं पुनरावलोकन होणार, ज्यांनी इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशनची परवानगी मागितली आहे. या समितीच्या शिफारशीवर डीसीजीआय निर्णय घेणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी कोरोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER