मीरा – भाईंदरमध्ये १४ एप्रिलपर्यंत दुचाकी वाहनांना पेट्रोल विक्री बंद

petrol-sale-stops-due-to-corona-virus

मीरा – भाईंदर : मीरा – भाईंदर मनपाच्या हद्दीत १४ एप्रिलपर्यंत दुचाकी वाहनांना पेट्रोल विक्री बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

‘लॉकडाऊन’च्या काळातही काही लोक बाहेर फिरत आहेत यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ‘सामाजिक दुरत्व’चा परिणाम साधण्यात बाधा येते आहे हे लक्षात घेऊन दुचाकी वाहनांना पेट्रोल विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.